एफआरपीचे पैसे 14 दिवसात मिळावेत, मागील रकमांचे 15 टक्केप्रमाणे व्याज द्यावे, यासह अन्य मागण्या घेऊन व शेतकऱ्यांच्या अडचणीला वाचा फोडण्यासाठी शिरापूर ( ता. मोहोळ ) येथील शेतकरी व समाजसेवक अनिल आबाजी पाटील हे पोतराजाचा वेश परिधान करून हलगी वाजवत शिरापूर ते साखर आयुक्तालय पुणे अशा प्रवासाला चालत निघाले आहेत.

तशा आशयाचे लेखी निवेदन त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे. मोहोळ तालुक्यात हे वेगळे आंदोलन असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी जागे व्हावे, यासाठी आपण हलगी वाजवत पुण्याला निघालो आहोत. यात कुठलाही प्रसिद्धीचा स्टंट नाही. रस्त्यात भूक लागली तर भाकरी मागून खाणार, कारण कारखानदारांनीच तशी वेळ शेतकऱ्यावर आणली आहे. माझ्या खिशात फक्त तीस रुपये आहेत, असे पाटील यांनी सांगितले .
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार