शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये कला शाखेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सन 2022-23 पासून कै. कर्मवीर डॉ. निवृत्ती गोविंदराव तथा मामासाहेब जगदाळे स्मृती पारितोषिक देण्यात येणार आहे.

श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील निवृत्त शिक्षक श्री. हनुमंत येडाप्पा पवार यांनी कै. कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांचे कार्यास आदरांजली म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये कला शाखेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी 5000/-रुपयांचे रोख पारितोषिक ठेवले आहे त्यासाठी श्री पवार यांनी एक लाख रुपयांचा धनादेश प्र. कुलसचिव प्रा. डॉ. व्ही एन शिंदे यांचेकडे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुपूर्द केला.
सदर कार्यक्रमास मंगळवेढायचे विधीज्ञ विलासराव देशमुख प्रगतशील द्राक्ष बागायतदार व कापसेवाडी चे सरपंच श्री शिवशंकर गवळी प्रा सचिन पवार व प्रा डॉ व्ही एन शिंदे यांचेसह सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ