महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा शिक्षक संघ व लोकशाही आघाडी यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी आक्कलकोट येथे वखारिया विद्यालय उपळे दु. येथील गणित शिक्षक मा. श्री अनिल रमेश वैद्य यांना शिक्षक आमदार मा. श्री जयंत आसगावकर ,आमदार मा. श्री. सचिन कल्याणशेट्टी, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा. श्री ज्ञानेश्वर कानडे ,राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष मा. श्री जी. के थोरात, सचिव मा. श्री सचिन झाडबुके सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. दयानंद श्रीरंग रेवडकर , ज्येष्ठ शिक्षक श्री. शंकर शिंदे सर, श्री. सदाशिव सोनके सर, श्री.रमेश लंकेश्वर सर, श्री. दत्तात्रय राऊत सर, श्री. नामदेव महाले सर, श्री. विलास शिंदे सर, श्रीमती. शामल तवले मॅडम, श्री. अविनाश शेंडगे सर , श्री. दादासाहेब धनके सर, श्री. नागनाथ वाघ मामा, श्री . मिलिंद सुरवसे मामा, श्री विकास बुरगुटे व सर्व परिवारजन, तसेच सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे अध्यक्ष मा. श्री. डॉ. बबन यादव साहेब, उपाध्यक्ष मा. श्री. नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी मा. श्री. प्रकाश पाटील, जॉइंट सेक्रेटरी मा. श्री अरुण देबडवार, खजिनदार मा .श्री जयकुमार शितोळे बापू , शालेय समितीचे चेअरमन मा. श्री. दिलीप मोहिते, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री दयानंद श्रीरंग रेवडकर, उपळे ग्रामस्थ यांनी श्री अनिल रमेश वैद्य यांचे हार्दिक अभिनंदन केले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर