बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने साकत या गावी विश्वनाथ सोनवणे यांनी केलेल्या मागणीनुसार साकत गावातील शिक्षक गणेश जानराव हे लहान मुलांची शिकवणी घेतात त्यासाठी त्यांना एक फळा व शालेय साहित्य वाटप केले.
बुद्ध विहारांमध्ये हा कार्यक्रम करण्यात आला. ओन्ली समाजसेवा संस्थेच्या अध्यक्ष राहुल वाणी यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केला. संस्थेचे मार्गदर्शक सुनील पल्ले, माणकोजी ताकभाते, सागर घंटे, नागनाथ सोनवणे, राहुल भालशंकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ सोनवणे, बालाजी गायकवाड, रवी कुडवे,धनाजी गायकवाड, रवींद्र गायकवाड, बाळासाहेब अडसूळ, राजेंद्र ननवरे, गणेश जानराव, राहुल भालशंकर, लहान मुले व ओन्ली समाजसेवेचे पदाधिकारी होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास सोनवणे यांनी केले यावेळी राहुल वाणी, बाबासाहेब गायकवाड, नागनाथ सोनवणे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लहान मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. आशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी दिली.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न