शतकांची परंपरा असणारी श्री गजानन महाराज पालखी शेगाव आज बार्शी येथील मुक्कामानंतर सकाळी पुढे मार्गस्थ झाली. काल बार्शी येथे मुक्काम करून आज रविवारी सकाळी माणकेश्वरमार्गे पुढे मार्गस्थ झाली.

श्री क्षेत्र पंढरपूर येथून परतीच्या प्रवासास निघालेल्या शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचे बार्शी शहर तालुक्यातील भाविकांनी उत्साहात स्वागत केले. गजानन महाराज पालखीचे शहरात आगमन म्हणजे आबालवृद्ध व भाविकांसाठी आनंदाची पर्वणी असते. यावेळी श्री भगवंत मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते.
गजानन महाराज दिंडीत सहभागी असणाऱ्या वारकर्यांची मोफत दाढी कटिंग सेवा नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महेश वाघमारे, बालाजी गायकवाड गणेश घाडगे, विशाल घाडगे, सारंग दळवी, संतोष वैद्य, दत्ता डिगे, विशाल डाके यांच्या मार्फत करण्यात आली.

पालखी स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखीचे शहरात आगमण होताच उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल , मुख्याध्याकारी अमिता दगडे – पाटील, सपोनी स्वप्नील इज्जपवार, सपोनि ज्ञानेश्वर उदार यांच्यासह इतर मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले.
खांडवी मुक्काम नंतर सकाळी कुर्डूवाडी मार्गे बार्शी शहराती कुर्डुवाडी रोडवरील रामेश्वर मंदिरा गजानन महाराज पालखीचे आगमन झाले या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याच पहायला मिळाले. याठिकाणी वारकऱ्यांना अन्नदा करण्यात आले. बार्शी शहरातील प्रमुख मार्गावरून भगवंत मंदिराशेजारील नियोजित ठिकाणी पालखीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंत तेथे पालखी विसाव्यासाठी थांबली. दिवसभर शहर व ग्रामीण भागामधुन आलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
बार्शी वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वृक्ष दिंडी काढून
बार्शी शहरात पालखीचे स्वागत करण्यात आले. दुतर्फा उभे राहून हातात एक रोपटे घेऊन वृक्षारोपणाचा संदेश देत पालखीचे शहरात स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ