बार्शी : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने एम.ए. मराठी विषयाचा अभ्यासक्रमात येथील प्रा. डॉ. सुनील विभूते यांच्या “मिरॅकल” या विज्ञानकथा संग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.
मानवी भावभावना व ज्वलंत सामाजिक समस्या यांची भविष्यवेधी विज्ञान संकल्पनांची केलेली उत्कृष्ट गुंफण हे या पुस्तकातील कथांचे वैशिष्ट्य आहे. दहशतवादापासून परग्रहवासीयांच्या स्वारीपर्यंत राक्षसमानवापासून यंत्रमानवापर्यंत विविध विषय डॉ. विभूते यांनी पुस्तकात हाताळले आहेत.
डॉ. विभूते यांच्या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व लेखिका डॉ. छाया पाटील, डॉ. सदानंद बोरसे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, केमिस्ट्री असोसिएशन, सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ, जिह्यातील मसापच्या विविध शाखा व विविध साहित्य संस्था, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व सहकारी प्राध्यापक यांनी विभूते सरांचे अभिनंदन केले.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर