पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा श्री. सुशीलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,सोलापूर येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेत श्री.शिवाजी महाविद्यालय,बार्शीच्या खेळाडूंनी मिळवलेले यश पुढीलप्रमाणे – करुणा गुंजाळ 100 मी हार्डल प्रथम क्रमांक, बांबू उडी आल्फिया शेख प्रथम क्रमांक. श्वेता बगाडे 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक, 100 X 400 रिले मुले तृतीय क्रमांक यामध्ये आदित्य जाधव, आदित्य गायकवाड, रणजीत गायकवाड, अभिजीत वांगदरे, यश भाट यांचा समावेश होता तसेच 100 X 400 मी. रिले मुली तृतीय क्रमांक यामध्ये श्वेता बगाडे, करुणा गुंजाळ, वैभवी काळे, अल्पिया शेख, आकांक्षा जाधव यांचा समावेश होता.
त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारणी संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अब्दुल शेख, प्रबंधक प्रमोद जाधव, संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विजयी संघास शारिरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डाॅ. विजयानंद निंबाळकर, डॉ.रामहरी नागटिळक, प्रा. संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड