श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेतील सेवानिवृत्त प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेच्यावतीने स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यामध्ये 200 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जनरल सेक्रेटरी, माजी संस्था रजिस्ट्रार श्री.व्ही.एस. पाटील होते. प्रमुख उपस्थितांमध्ये संस्था अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष श्री. नंदन जगदाळे, सचिव श्री. पी. टी. पाटील, सहसचिव अरूण देबडवार खजिनदार श्री. जे.सी. शितोळे उपस्थित होते.
संस्थेतील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा संस्थेच्या विकासामध्ये, प्रगतीमध्ये आणि वाटचालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. त्यांनी केलेल्या संस्थेतील सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन तसेच त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा संस्थेच्या आगामी वाटचालीमध्ये उपयोग व्हावा यासाठी केले होते.
सदर कर्मचारी आणि पुढची पिढी हे कर्मवीर मामासाहेब यांच्या विचाराने वाटचाल करीत असताना संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये कर्मवीर परिवार म्हणून सहभागी व्हावेत असे प्रास्तविकात सचिव पी. टी. पाटील यांनी सांगितले. डॉ. बी. वाय. यादव यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रगतीमध्ये माजी कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहेआणि इथून पुढे ही असेच योगदान द्यावे असे सांगितले. सेवानिवृत्तीनंतर संस्था कर्मचाऱ्यांसाठी विविध आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवणार असून संस्थेच्या आगामी काळातील वाटचालीमध्ये मार्गदर्शन करून सहकार्य करावे असे आवाहन केले. खजिनदार जे. सी. शितोळे, डॉ. सी.एस.मोरे आणि उपाध्यक्ष नंदन जगदळे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले तसेच संस्था सदस्य आणि या योजनेचे उद्गाते संस्था कार्य कारिणी सदस्य श्री. राजेंद्र पवार यांनी पाठवलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन केले. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. मदन जगताप, प्रा. एम .बी .पाटील. प्रा. सी. बी. गंभीर, श्री.भास्कर गाढवे, श्री. जी. बी. शिंदे यांनी या उपक्रमाबद्दल संस्थेचे अभिनंदन करून संस्थेच्या वाटचालीमध्ये सहभाग नोंदवण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एक कर्मवीर परिवार म्हणून आम्ही संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात आमच्या कुटुंबीयांसमवेत सहभागी राहूत असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.व्हि.एस.पाटील यांनी संस्थेच्या नवीन योजनां विषयी माहिती दिली.
कर्मवीर सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी उपप्राचार्य व्ही. जे. देशमुख, उपाध्यक्ष आबदारे, सर, सचिव डी. बी. पाटील, सहसचिव ए.बी. देशमुख, खजिनदार आर. व्हि.गायकवाड आणि सर्व पदाधिकारी यांनी सदर कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, संस्थेतील माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार श्री. आबदारे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. किरण गाढवे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण गाढवे यांनी केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!