Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शी तालुक्यातील ६३ गावांतील दलित वस्त्यांच्या विकासासाठी २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी तालुक्यातील ६३ गावांतील दलित वस्त्यांच्या विकासासाठी २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी तालुक्यातील ६३ गावांतील, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मंजूर झाला आहे.
मित्राला शेअर करा

भाजपा जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत व तेथील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार राजेंद्र राऊत यांना सदरची कामे सुचविली. त्यांनी सुचविलेल्या विकास कामांकरीता आमदार राजेंद्र राऊत यांनी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे पत्राद्वारे सदरच्या कामांची व त्यांच्या निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार बार्शी तालुक्यातील ६३ गावांतील, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मंजूर झाला आहे.

सदरचा निधी बार्शी तालुक्यातील सर्जापूर, इर्ले, कव्हे, मुंगशी आर, ढोराळे, सदाशिव नगर, मांडेगांव, आंबेगाव, इर्लेवाडी, धामणगाव दु. घारी, तडवळे, सावरगांव, उपळाई ठों, बाभळगांव, साकत, भान्सळे, चुंब, यावली, भोयरे, आगळगांव, लाडोळे, देवगांव, राळेरास, हळदुगे, कोरफळे, सासुरे, गौडगांव, नारी, कापसी, संगमनेर, खांडवी, पिंपरी आर, ज्योतिबाची वाडी, तुर्क पिंपरी, गुळपोळी इत्यादी ६३ गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता वापरण्यात येणार असून, त्यामध्ये या दलित वस्त्यांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण, पेविंग ब्लॉक रस्ता करणे, पाणी पुरवठा सोय करणे, नवीन गटार बांधकाम, नवीन बंदिस्त गटार बांधणे, समाज मंदिर बांधणे, आरो प्लांटची उभारणी करणे, स्मशानभूमी पोहोच रस्ता ‌इत्यादी प्रकारची विकास कामे करण्यात येणार आहेत.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, माजी जि‌.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर, मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, प्रमोद वाघमोडे, अविनाश मांजरे, इंद्रजीत चिकणे, सुमंत गोरे, उमेश बारंगुळे उपस्थित होते.