Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > तेर येथील शासकीय हरभरा खरेदी केंद्रांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ

तेर येथील शासकीय हरभरा खरेदी केंद्रांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ
मित्राला शेअर करा

( तेर प्रतिनिधी :- हरी खोटे ) उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

तेर ता उस्मानाबाद येथे संत गोरा कुंभार फार्म प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासकीय हरभरा खरेदी केंद्रांची उभारणी करण्यात आली यावेळी या खरेदी केंद्राचा सोमवार दिनांक ११ एप्रिल रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी उस्मानाबाद – कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील , उस्मानाबाद तालुका शिवसेना प्रमुख सतीश सोमाणी , माजी सरपंच महादेव खटावकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे

या शासकीय हरभरा खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्यास चांगला भाव मिळणार आहे या खरेदी केंद्रामुळे तेर व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे तालुका प्रमुख सतीश कुमार सोमाणी यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले कार्यक्रमास उस्मानाबादचे नगरसेवक सोमनाथ गुरव , माजी सरपंच महादेव खटावकर , नामदेव कांबळे , रियाज कबीर , अविनाश इंगळे , अमोल थोडसरे , सुर्यकांत नाईकनवरे , दादा हाजगुडे पांडुरंग वाकुरे , माजीत काझी , राजेश बुके , काका राऊत , हिजु काझी , अनंत कोळपे , रतन नाईकवाडी , आदिंसह परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते