सध्या वनमहोत्सवाचा कालावधी सुरु असून केंद्र व राज्य शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव निमित्त विविध पर्यावरणविषयक जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आहेत.
सध्याच्या काळात इंधनाच्या अतिरिक्त वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सदरील प्रदूषण हे पर्यावरण व मानवांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
यावर काहीतरी उपाय म्हणून शासकीय विभाग व विविध सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत याचाच एक भाग सायकल चालवून आपण इंधन बचत करून प्रदूषण कमी करण्यास हातभार लावू शकतो. तसेच सायकल चालविण्यामुळे उत्तम व्यायाम होऊन शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मागील अनेक वर्षापासून बार्शी येथील अनेक नागरिक नियमितपणे सायकल चालवून पर्यावरणविषयक जनजागृतीचे काम निरंतरपणे करीत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नातून बार्शी सायकलिंग क्लब हा देशपातळीवर नावारूपास आला आहे. शालेय विध्यार्थी हे आपल्या भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत.
सदरील सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृतीचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे याकरिता या जाणिवेतून सामाजिक वनीकरण परिक्षेत्र बार्शी कार्यालयाच्या माध्यमातून दि . 07/08/2022 या रविवार च्या सुट्टीच्या दिवशी सकाळी 8:00 ते 10:00 पर्यंत छत्रपत शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन बार्शी व परिसरातील विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच बार्शी सायकलिंग क्लब च्या माध्यमातून सहभागी होणार्या सर्व विद्यार्थ्यांना बॅग, अल्पोपहार व पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे सदरील नियोजन योग्य प्रकारे व्हावे म्हणून शाळेतील क्रिडा शिक्षक, विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही इतर शिक्षक यांनीही उस्फूर्तपणे उपस्थित राहण्याचे तसेच शाळेतील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदरील रॅलीत सहभाग घेण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र बार्शीचे एम. एस. बारबोले यांनी केले आहे.
More Stories
लोकसेवा विद्यालयाच्या आदर्श कोल्हे याची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
एसटीच्या नव्या लालपरीचा लूक अखेर आला समोर
शनिवारी १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंड्यात