राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला सोलापुर जिल्हा अध्यक्ष पदी अॅड. सुप्रिया गुंड पाटील यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सौ.रुपाली चाकणकर यांनी केली आहे खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक नियुक्ती पत्र देण्यात आहे.
राष्ट्रवादी काँगेस अध्यक्ष खा.शरद पवार,प्रदेशाध्यक्ष ना जयंत पाटील,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,खा. सुप्रिया सुळे राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा.फौजिया खान याना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी,पक्ष बळकटीकरण,पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अॅड.सुप्रिया गुंड पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
खा.सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की सोलापुर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबुत होण्यासाठी आता महिला सेल देखील आघाडीवर असेल कारण उच्च शिक्षीत परंतु तळागाळात काम करणारा चेहरा जिल्हाध्यक्ष म्हणून लाभला आहे निरीक्षक दीपाली पांढरे यावेळी म्हणाल्या की,सुप्रिया गुंड पाटील यांच्या प्रयत्नाने सोलापुर जिल्हा महिला आघाडी राज्यात सर्वप्रथम असेल.
अॅड.गुंड पाटील यांनी निवडीनंतर,पक्षाने दाखवलेला विश्वास सर्वांना सोबत घेऊन जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मजबुत पक्ष बळकटीकरण बांधणी आणि करून सार्थ करून दाखवु असा विश्वास करत पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल तसेच या कामी सर्वानी केलेली शिफारस दाखवलेला विश्वास याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
अॅड.गुंड पाटील यांचे निवडीनंतर पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे,निरीक्षक दीपाली पांढरे जिल्हाध्यक्ष काका साठे,कार्याध्यक्ष उमेश पाटील आ.बबनदादा शिंदे आ.संजय शिंदे आ.यशवंत माने प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील,माजी आ. राजन पाटील निरंजन भुमकर आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन