सोलापूर जिल्ह्यात नव्याने नातेपुते , श्रीपूर महाळुग , वैराग , अनगर येथे नगरपंचायत अस्तित्वात आली आहे . अकलूज येथे नगरपरिषद अस्तित्वात आली आहे . त्यामुळे जिल्हापरिषद सदस्य संख्या बदलणार आहे . तसेच मतदार संघ गटात सुद्धा मोठे फेरबदल होऊ शकतात यातच शासनाने जिल्हापरिषद समस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे .
महाराष्ट्र सरकारचा निर्णय संक्षिप्त
राज्यातील जिल्हा परिषद सदस्य संख्येत होणारी वाढ
राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तर या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येईल
कितीने होणार वाढ
● सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे.
● तर आता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून –
● जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 करण्यात येईल – या सुधारणे नंतर एकूण जिल्हा परिषद सदस्यांची संख्या , 2 हजार वरुन 2 हजार 248 इतकी होईल
राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे . या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे . सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे . या मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे . या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरुन 2248 इतकी होईल . त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होईल .
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न