यावर्षी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण भारतभर “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. भारतीय रेल्वेतर्फे सोलापूर रेल्वे स्थानकावर हुतात्माच्या परिवराच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांचा हस्ते हुतात्मा एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेल्वे व्यवस्थापक श्री. शैलेश गुप्ता यांच्या हस्ते हुतात्माच्या परिवार आणि स्वातंत्र्य सैनिकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान, हुतात्मा मलप्पा धनशेट्टी यांची पुत्र वधू , हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू , स्वातंत्र्य सैनिक श्री. बाबू हसन नदाफ आणि श्री. दत्तात्रेय धोंडीबा हिभारे यांच्या हस्ते हुतात्मा एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना केली.
स्वातंत्र्य सैनिक श्री. बाबू हसन नदाफ याची वय 103 वर्ष आहे आणि त्यांनी 1942 चा महात्मा गांधीजीनी केलेला “चले जाव” आंदोलनात भाग घेतला होता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. शंकरराव चौव्हाण यांचे मित्र होते व श्री. दत्तात्रेय धोंडीबा हिभारे यांची वय 93 वर्षे आहे यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बरोबर निझामा विरुद्ध केलेल्या आंदोलनात भाग घेतला.
मंडल रेल प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले की ‘आजादी का अमृत महोत्सव” च्या अंतर्गत भारतीय रेल्वेने 75 रेल्वे स्थानके आणि 27 गाड्या निवडल्या आहेत, त्यापैकी मध्य रेल्वेनचे चार स्थानके आणि दोन गाड्या निवडल्या आहेत. त्यापैकी सोलापूर विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसची निवड करण्यात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सोलापूर चे आमदार माननीय सुभाष देशमुख, अपर मंडल रेल प्रबंधक श्री. शैलेन्द्र सिंग परिहार, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री. प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल कर्मिक अधिकारी,वरिष्ठ मंडल तांत्रिक अभियंता श्री. एस. एस. साळवे, वरिष्ठ मंडल इलेक्ट्रिक अभियंता अनुभव वाषर्णेय, वरिष्ठ मंडल सिग्नल आणि दूरसंचार अभियंता राहुल कुमार आणि वरिष्ठ मंडल रेल्वे सुरक्षा आयुक्त श्रेयांश चिंचवडे इत्यादि अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान