Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सोलापूर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ भव्य वाचनालय व अभ्यासिका वास्तू उभारणार

सोलापूर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ भव्य वाचनालय व अभ्यासिका वास्तू उभारणार

सोलापुरातील डाळिंबी आड येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने वाचनालय व अभ्यासिका बांधण्यात येणार असून त्या वास्तूचे भूमिपूजन नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते पार पडले .
मित्राला शेअर करा

या प्रसंगी कार्यकारी अभियंता संदीप कारंजे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक विनोद भोसले, माजी उपमहापौर नानासाहेब काळे दिलीप कोल्हे, दास शेळके, पुरुषोत्तम बरडे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

उभारण्यात येत असलेल्या वाचनालय व अभ्यासिका या दोन्हीं वास्तूसाठी नगरसेवक विक्रांत वानकर यांनी 9 लाख रुपये निधी मंजूर केला असून त्यासाठी श्री शिवजन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड यांनी त्यांचे आभार मानले. या प्रसंगी ‘ छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘ या घोषणेने परिसर दुमदुमला होता.

यावेळी चंद्रकांत वानकर सुनील रसाळे राजन जाधव नगरसेवक सुनील कामाटी, नगरसेवक चेतन नरोटे, मनीष सुभाष देशमख माऊली पवार, भाऊसाहेब रोडगे, गणेश डोंगरे, संजय सरवदे, अनिल म्हस्के, श्रीकांत घाडगे प्रताप चव्हाण तुकाराम मस्के प्रतापसिंह चौहान निर्मला शेळवणे, उषा गायकवाड देविदास घुले सचिन स्वामी लहू गायकवाड महेश देवकर विजय पुकाळे आदींचीही उपस्थिती होती.