विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून एस. आर. एस अकॅडमी या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक शाहरुख शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभालेले तहसीलदार सुनील शेरखाने, कविवर्य रामचंद्र इकारे सर, मा.नितीन मोहिते सर, प्रा.राहुल पालके, प्रा.समाधान लोंढे व मोहम्मद बागवान सर, मिलिंद ताकपीरे व सूरज पाटील (म.पो.) ओम पाटील, किरण कांदे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कविवार्यांनी स्पर्धेविषयी आपले गोड मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
बक्षीस वितरण सोहळा शिवश्री आनंद काशीद व सहकाऱ्यांच्या उपस्थितत पार पडला. त्याप्रसंगी आनंद काशीद यांनी सर्वधर्म समभाव या विषयावर आधारित मार्गदर्शन केले. लोंढे सर यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच नितीन मोहिते सर यांनी चित्रकलेच्या माध्यामातून करियरच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.
हे स्पर्धक ठरले विजयाचे मानकरी
वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक – शेषराव गुंड
द्वितीय क्रमांक – श्रवण अडसूळ
तृतीय स्वराली सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले.
चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक विभागून
कृष्णा पोद्दार, मानसी काळे
द्वितीय क्रमांक विभागून
शुभम वखारिया, गायत्री शेळके तृतीय क्रमांक विभागून
मनस्वी पाटील, श्रुती पाटील
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा खिस्ते व दुहिता खाडे यांनी अतिशय सुंदर अश्या शैलीत केले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एस.आर.एस अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत