Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > समाजकल्याणच्या वसतीगृहात प्रवेश देणे सुरू

समाजकल्याणच्या वसतीगृहात प्रवेश देणे सुरू

समाजकल्याणच्या वसतीगृहात प्रवेश देणे सुरू
मित्राला शेअर करा

सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. समाज कल्याणच्या वसतीगृहामध्ये ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देणे सुरू आहे, इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये मुला-मुलींचे एकूण 16 शासकीय वसतिगृहे आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ऑफलाईन पध्दतीने प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. वसतीगृहस्तरावर प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून वाटप सुरू आहे. याबाबत गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. आढे यांनी केले आहे.