राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना बार्शी व श्रीराम फिलामेंट प्रा. लि. बार्शी यांच्या सहयोगाने दि. १०.०५.२०२२ रोजी स्वतंत्र्याचा अमृत मोहत्सव वर्षानिमीत्त आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबीरात ५० पेक्षा जास्त महिला कामगारांनी आरोग्य तपासणी, रक्त तपासणी व मोफत औषध वाटपाचा लाभ घेतला त्याप्रसंगी प्रभारी वैधकिय अधिकारी डॉ (श्रीमती) स्वाती कि. मसाळ यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. सदर शिबीरास सेवा दवाखाना बार्शी येथील कर्मचारी श्रीमती माया खाडे, श्री. रणजित दराडे, श्री. अबुजर मुल्ला व श्री. संजय वाघेला यांनी योगदान दिले.
या शिबीरास श्रीराम फिलामेंट प्रा. लि. चे श्री. प्रभाकर बागडे, श्री. दिपक पाटील, श्री. गणेश उमाप व श्री. निखील चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल