Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > १४ वर्षाखालील मुलांच्या शालेय तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूल विजयी

१४ वर्षाखालील मुलांच्या शालेय तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूल विजयी

१४ वर्षाखालील मुलांच्या शालेय तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूल विजयी
मित्राला शेअर करा

अंतिम सामन्यात विराट भिसे ठरला उत्कृष्ट फलंदाज

बार्शी – शुक्रवार (दि.६) शिवशक्ती मैदान येथे पार पडलेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या शालेय तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत बार्शीतील सुलाखे हायस्कूल च्या संघाने सुयश विद्यालय बार्शीच्या संघाला ४४ धावांनी पराभूत करून दणदणीत विजय मिळवित तालुकास्तरीय क्रिकेट चषकावर आपले नाव कोरले.

या तालुकास्तरीय अंतिम सामन्यात सुलाखे हायस्कूलच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत निर्धारित ८ षटकामध्ये ३ बाद ७८ धावा केल्या. यामध्ये विराट भिसे (इ. ६ वी क) याने तडाखेबंद ३२ धावा काढल्या. तर सुशांत शेट्टी (इ. ८ वी ड) याने वेगवान फलंदाजी करत २६ धावा काढल्या.

तर ७९ धावांचे लक्ष्य गाठताना सुयश विद्यालय संघ ८ षटकात ८ बाद ३४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. सुलाखे हायस्कुल संघाकडून गोलंदाजीमध्ये समर्थ सावळे २ बळी, विराट भिसे २ बळी, रत्नेश राऊत १ बळी, प्रणव जाधवर १ बळी, श्लोक वायचळ १ बळी, प्रथमेश घोटाळे १ बळी घेत संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात विराट भिसे उत्कृष्ठ फलंदाज ठरला. तर उपांत्य फेरीत प्रणव जाधवर याने 24 व श्रीहर्ष देशमुख याने 21 धावा काढत संघासाठी मोक्याच्या क्षणी योगदान देत संघाला विजय मिळवून दिला. संघास सुहास देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, क्रीडा शिक्षक दत्तप्रसाद सोनटक्के, सुलाखे हायस्कुल चे क्रीडा विभाग प्रमुख प्रमोद माळी, समीर वायकुळे, सुहास शिंदे, राज स्पोर्ट्स चे संतोष गाडेकर उपस्थित होते.

यशस्वी खेळाडूंचे बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, उप मुख्याध्यापक रा. द. इंगळे, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विजयी संघातील खेळाडू खालीलप्रमाणे –
विराट भिसे (कर्णधार), प्रणव जाधवर (उपकर्णधार),
श्रीहर्ष देशमुख (यष्टीरक्षक), हर्षवर्धन कदम, श्लोक वायचळ, सुशांत शेट्टी, शौर्य पाटील, रत्नेश राऊत, प्रथमेश घोटाळे, वरद चौरे, समर्थ सावळे, कृष्णा गुळवे, ऋग्वेद देशमुख, फरहान मुल्ला, गौरव देवधरे, अमित पोकळे
कोच – सुहास देशमुख