श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. उपळा शिवारात वाहने आणि यंत्राचे पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील हे काम ३० महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी हा प्रकल्प जाहीर केला होता. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहे असे प्रारंभ कार्यक्रम प्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.
या प्रकल्पाचे काम २०१९ साली सुरू होणे अपेक्षित होते. मात्र श्री.उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना २.५ वर्षे राज्याचा हिस्सा न दिल्याने हे काम रखडले. राज्यात महायुतीचे सरकार येताच राज्याच्या हिश्श्याचा ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला आता गती आली आहे.
सुरूवातीला ५ वर्षात हे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र आपण सातत्याने आग्रह धरल्यामुळे या कामाचे ३ टप्पे करून हे काम २.५ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. उर्वरित २ टप्प्यांचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्यातील महायुती सरकारचे मनापासून आभार मानायला हवे. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांनी या प्रकल्पासाठी आपली जमीन दिली, त्यांचेही मनापासून आभार. ज्यांना जमिनीचे कमी दर मिळाले आहेत त्यांच्यासाठी देखील वाढीव मावेजा मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले आहे. कोणतेही चांगले काम करताना आपण सर्वप्रथम गणरायाला वंदन करतो. आज या अतिशय महत्वाच्या प्रकल्पाचा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला आहे.
वडगाव सिध्देश्वर येथील श्री. जयंत हिंगे गुरूजींच्या हस्ते विधीवत पूजा करून प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे आजचा दिवस धाराशिवकरांसाठी खूप महत्वाचा आहे.
हे कार्य निर्विघ्न पण आहे लवकरात लवकर पूर्णत्वास जावे हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना असे याप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर