ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या ‘महाआवास अभियान’ मुळे राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ४,४५,९१४ व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांतर्गत रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना,मोदी आवास घरकुल योजना, जनमन योजना ३,०४,४६६ अशा एकूण ७ लाख ५० हजार ३८० गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे स्वतःच्या पक्क्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
अभियान कालावधीत उत्कृष्ट काम संस्था व व्यक्ती यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्यास सर्वात जास्त ६.३७ लाख घरांचे उद्दिष्ट दिले आहे. गृहबांधणीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर