Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > सुमिन्तर इंडिया आर्गेनिक्स यांची सामाजिक बांधिलकी सीना तांदुळवाडी येथील जि. प. प्रशालेस आर. ओ. प्लॅन्ट भेट

सुमिन्तर इंडिया आर्गेनिक्स यांची सामाजिक बांधिलकी सीना तांदुळवाडी येथील जि. प. प्रशालेस आर. ओ. प्लॅन्ट भेट

मित्राला शेअर करा

सुमिंतर इंडिया ऑरगॅनिक्स (Suminter India Organics) सामाजिकदृष्ट्या जबाबदार, पर्यावरणीयदृष्ट्या उच्च-गुणवत्तेचे नैसर्गिक, सेंद्रिय उत्पादने आणि साहित्य तयार करणारी कंपनीआहे. सुमिंतर इंडिया ऑरगॅनिक्स 80,000 हून अधिक शेतक-यांच्‍या जवळून काम करत आहे, जे सेंद्रीय पिकांची लागवड करण्‍यासाठी, उत्पादन करण्‍यासाठी आणि प्रक्रिया करण्‍यासाठी सर्वात वाजवी आणि सर्वात नैतिक पद्धतींसह कार्य करते तसेच जगभरात शुद्ध नॉन-GMO उत्पादने वितरीत करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट प्रयत्न करणारी कंपनी आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना सुद्धा बाजारभावापेक्षा जास्त मोबदला देते.

या कंपनीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील शेतकरी व त्यांची कुटुंब यांच्या साठी अनेक लोकोपयोगी कामे केली जातात.

याचाच एक भाग म्हणून तांदुळवाडी सीना येथील जिल्हा परिषद शाळेस शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आर. ओ. ( RO ) PLANT) मोफत उपलब्ध करून देण्यात आला यासाठी तांदुळवाडी येथील जागरूक नागरिक अमोल अगतराव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

या RO प्लॅन्ट उद्घाटन प्रसंगी सुमिन्तर इंडिया आर्गेनिक्स (Suminter India Organics) चे टेंभुर्णी प्रोजेक्ट मॅनेजर नीलेश पाटील सुपरवायझर विक्रांत नरसाळे, सहायक महेश कान्हेरे जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक सरपंच रणजित गोपाळराव पाटील, शालेय समिती अध्यक्ष विष्णु अनपट, सर्जेराव कदम, बापूसाहेब गवळी, महादेव माने, पंकज गवळी, शशिकांत गवळी, अतुल परबत, बालाजी गवळी, अमोल भोसले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.