भारतमाला परियोजना (प्लॉट क्र.५, पॅकेज-२) अंतर्गत अंतर्गत अहमदनगर – सोलापूर – अक्कलकोट महाराष्ट्र / कर्नाटक बॉर्डर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्प (सोलापूरच्या स्पर कनेक्टीव्हीटी सोबत) कि.मी. ४१८/८०० ते ५४७/००० सहापदरीकरणासाठी (सुरत-चेन्नई) महामार्गा अंतर्गत बार्शी तालुक्यातील संपादित गावचे बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची नुकसान भरपाई रक्कम अदा करणेकामी येणाऱ्या अडवणीबाबत गाव भेट दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजने अंतर्गत सुरत-चेन्नई या राष्ट्रीय हरित महामार्गासाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरु असून सोलापूर जिल्हयाअंतर्गत बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, व अक्कलकोट या तालुक्यामधून हा महामार्ग जात आहे.
संपादन मंडळ यांनी दि. 21/09/2023 रोजीच्या पत्रान्वये सद्यस्थितीत पॅकेज क्र.14 (सोलापूर (जिल्हयातील) चे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराची निवड करण्यात आलेली आहे. सदरील प्रकल्प हा भारत सरकारचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याने वेळोवेळी प्रधानमंत्री कार्यालयातून आढावा घेतला जात आहे. तरी सदर निवाडयातील नुकसान भरपाई हि लवकरात लवकर संबंधित खातेदरांना वाटप करण्यात यावी व जमिनीचा ताबा देण्यात यावा जेणे करुन महामार्गाचे काम करणे सोईस्कर होईल अशी विनंती केली आहे.
तरी बार्शी तालुक्यातील 16 गावांपैकी 1) हिंगणी (आर) 2) रातंजन 3) सर्जापूर 4) सासुरे 5) वैराग 6) काळेगाव 7) मानेगांव 8) घाणेगांव 9) दडशिंगे 10) पानगांव 11) बळेवाडी 12) कव्हे 13) कासारवाडी 14) अलीपूर 15) लक्ष्याचीवाडी 16) नागोबाचीवाडी असे एकूण 16 गांवातील बाधित गट धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तरी मागणी प्रस्ताव सादर करुन त्यांची त्वरीत तपासणी करुन नुकसान भरपाईची रक्कम अदा करणेकामी पुढील प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी गांव / मंडळअधिकारी पातळीवर नुकसान भरपाई रकमेचे प्रस्ताव दाखल करुन घेणे, दाखल प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता करुन देणे, संबंधित आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेणेकामी खालील प्रमाणे नमूद केलेनुसार गाव निहाय गाव भेट कार्यक्रम निश्चित करणेत आलेला आहे. वरीलप्रमाणे नमूद गाव भेट कार्यक्रमानुसार संबंधीत गावामधील नोटीस प्राप्त शेतकरी यांना उपस्थित करणेबाबत संबंधीत तलाठी यांना कळविण्याचे आदेश प्रमोद गायकवाड (उपजिल्हाधिकारी)भूसंपादन क्र. ११ सोलापूर यांनी दिले आहेत.
नुकसान भरपाई नोटीस ज्या खातेदारांना प्राप्त झाले आहेत त्यांनाच कॅम्प मध्ये प्रवेश देणेत येणारअसून शिबिरात संबंधित गांवचे तलाठी आणि मंडळ अधिकारी तसेच नायब तहसिलदार हजर राहणार आहेत. महा-ई-सेवा चालकास त्यांचेकडील संगणक, प्रिंटर, झेरॉक्स, नेट या सर्व सोयीसह हजर राहणेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
शेतकर्यांच्या सोईसाठी सदर शिबीराचे दिवशी स्टॅम्प विक्रेता यांना गांवी हजर राहून स्टॅम्प विक्री करणेबाबत लेखी सूचना द्याव्यात आल्या आहेत. वि.का.से.सो. बँक अधिकाऱ्यांना सदर शिबीराचे दिवशी उपस्थित राहणार आहेत आहे. संबंधीत गावामधील राष्ट्रीयकृत व को. ऑप. बँकेच्या व्यवस्थापकांना सदर शिबीरच्या वेळी उपस्थित राहणार आहेत ज्या गावामध्ये राष्ट्रीयकृत बँक व को. ऑप. बँका नाहीत परंतु लगतच्या गावामध्ये गावक-यांचे व्यवहार होतात अशा बँक व्यवस्थापकांना उपस्थित राहणार आहेत.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!