दिनांक 03/09/2022 रोजी सामाजिक दायित्व देवून सुर्योदय ववृध्दाश्रमास अत्यंत आवश्यक मदत करुन साजरा केला.
धनंजय ( धनु भाऊ) जाधव स्वराज्य संघटना प्रवक्ते, सामाजिक क्षेत्रातील विविध आघाड्यांवर काम करणारे बंधू धनुभाऊ त्यांचा वाढदिवस अवास्तव खर्च टाळून सामाजिक दायित्व देवूनच दर वर्षी साजरा करतात.

समाजातील वंचित गरजू घटकांना मदत करतात. त्याच पद्धतीने या वर्षी सुर्योदय वृध्दाश्रम हे निराधार, बेघर, गरजू वृद्धांना जगण्याचा आधार देणारे सुर्योदय वृध्दाश्रमातील वृद्धांना अत्यंत गरजेचे साहित्य बेड्स, गाद्या, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, धान्य, फळे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सुर्योदय वृध्दाश्रमास सुपूर्द केले.
सर्व वृद्ध मातां माऊलीं सोबत फळे कापून वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांनी सुर्योदय वृध्दाश्रम पाहीले आणि वंचीत वृद्धांना, समाजातिल वंचित घटकांना भविष्यात स्व:ता मदत करण्याचे आश्वासन आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले.
तसेच धनु भाऊ यांनी कोणतीही अडचण आल्यास किंवा काही मदत लागल्यास मी आणि माझे सहकारी मित्र आम्ही मदत करु अशे आश्वासन दिले.
धनुभाऊ ,यांनी त्यांच्या जन्मदिवसा निमित्त सुर्योदय वृध्दाश्रमास केलेली मदत आणि वृद्ध माय, माऊलींना दिलेला आनंद अनमोल आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल धनंजय (धनुभाऊ) जाधव यांचे सौ. छायाताई भगत व सुर्योदय वृध्दाश्रम परिवारातर्फे आभार मानले .
सुर्योदय वृध्दाश्रमास आपली मदत, सहकार्य व साथ अशीच असु द्यावी ही विनंती.
आपण ही सुर्योदय वृध्दाश्रम च्या कार्यात सहभागी होऊन मदत करू शकता. तेजस्वी फाऊंडेशन संचलित- सुर्योदय वृध्दाश्रमास सहकार्य करावे असे आवाहन छायाताई भगत यांनी केले आहे.
संस्थेचे बँक खाते.
( बँक :- जनसेवा सहकारी बँक.)
संस्थेचे नाव :- 𝐓𝐄𝐉𝐀𝐒𝐖𝐈 𝐅𝐎𝐔𝐍𝐃𝐀𝐓𝐈𝐎𝐍
खाते क्रमांक :- 13023018803
IFSC CODE :- 𝐉𝐀𝐍𝐀0000013 )
Phonepe No. 9881899732
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता.
सौ. छायाताई भगत.
9604516553
राधा सुभाष लाटे.
9921912727
तेजस्वी फाउंडेशन संचलित सुर्योदय वृध्दाश्रम
पत्ता:- गुरुकृपा बिल्डिंग, धायरी- डि. एस. के. रोड धायरी, पुणे- ४११०४१.
आपण सुद्धा जेष्ठांसाठी सुरु झालेल्या उपक्रमास (वृध्दाश्रमास) एकदा अवश्य भेट द्या
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
Voter List 2023 downloadमतदार यादीतआपले आहे नाव आहे का?डाउनलोड करा मतदार यादी
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार