या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांनी केले. तसेच त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देखील भूषवले होते. या शिबिरामध्ये आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. सचिन लोंढे यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या दहा कसोट्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विनोद वाघमारे यांनी डिजिटल बँकिंग विषयी माहिती दिली. पैसा व त्याचे हस्तांतरण तसेच बँकांचा उदय ते आजच्या आधुनिक बॅंकांपर्यंतचा प्रवास त्यांनी आपल्या आपल्या व्याख्यानात सांगितला. तिसरे वक्ते राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. अतुल कदम यांनी स्वच्छता अभियान व मतदार जनजागृती या विषयी मार्गदर्शन केले. भौगोलिक स्वच्छतेबरोबर मानवी मनाची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. अशाप्रकारची व्याख्याने स्वच्छतेसाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
महाविद्यालयात सुरू असणाऱ्या नवमतदार नाव नोंदणी कार्यक्रमाचा आढावा त्यांनी घेतला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर.आर. पाटील यांनी महाविद्यालयात अशा प्रकारचा तालुकास्तरीय कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमाचा लाभ करून घ्यावा असे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रा. बी.बी. बस्के प्रा. शंकर फुलवळे व १०७ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. मदनराव पाटील यांनी मानले.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत