Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे : सौंदरे उपसरपंच राजेंद्र सुरवसे

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे : सौंदरे उपसरपंच राजेंद्र सुरवसे

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे : सौंदरे उपसरपंच राजेंद्र सुरवसे
मित्राला शेअर करा

शिक्षकांनी जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सौंदरेचे उपसरपंच राजेंद्र सुरवसे यांनी केले.

उपसरपंच राजेंद्र सुरवसे आपले पद प्रतिष्ठा दूर ठेऊन गावातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात व यासाठी त्यांची दातृत्वाची ओंजळ सुद्धा नेहमी उघडी असते. सौंदरे गावातच नाही तर आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांना सुद्धा मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांची तळमळ माहीत आहे.

सौंदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ. ५ वीत शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ते म्हणाले की शिक्षकांनी जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सौंदरेचे उपसरपंच राजेंद्र सुरवसे म्हणाले.

यावेळी मंडल अधिकारी उमेश डोईफोडे, तलाठी गरड, ग्रामसेविका नागरगोजे, पिनू कानगुडे, भालचंद्र वाणी, शिवशंकर ढवण आदी उपस्थित होते. यावेळी प्रगती क्षीरसागर, श्रेया उंबरदंड, विराज खंदाडे व समृद्धी माशाळकर यांचा शिष्यवृत्तीमध्ये यश मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संजय बाळापुरी व कविता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.