Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > शिक्षण आपल्या दारी” या उपक्रमाद्वारे डोंगराळ भागात जाऊन शिक्षक यशवंत निकवाडे देतायत शिक्षणाचे धडे

शिक्षण आपल्या दारी” या उपक्रमाद्वारे डोंगराळ भागात जाऊन शिक्षक यशवंत निकवाडे देतायत शिक्षणाचे धडे

मित्राला शेअर करा

शिरपुर/तापी
वर्षी येथील आश्रम शाळेचे शिक्षक यशवंत निकवाडे हे शिक्षण आपल्या दारी या उपक्रमातंर्गत तालुक्यातील गुर्हाळपाणी पाड्यावर जावुन आदिवासी विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देत आहेत .


कोरोना व्हायरस मुळे अख्ख जग ठप्प पडले.लाखो माणसे मृत्यू पडले,अनेक उद्योगधंदे बुडाले,बेरोजगारी वाढली,अर्थव्यवस्था पोकळ झाली,शिक्षणाच्या बट्ट्याबोळ झाला,विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण सेतू अभ्यासक्रम (Bridge course) हा प्रयोग राबविण्याचे नियोजन केले.याच वेळेस राज्यातील आदिवासी विकास प्रकल्पाने पण ह्याच धर्तीवर “शिक्षण आपल्या दारी” हा प्रयोग राबविण्याचे ठरविले.ह्या विभागाने राज्यातील सर्व आदिवासी आश्रम शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांची व शिकवणा-या शिक्षकांची माहिती मागविली.त्यांनी एक आराखडा तयार केला.आदिवासी विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसतो,ते गरीब असतात,डोंगराळ भागात राहतात म्हणून ते शाळेत येवू शकत नाही म्हणून शिक्षकांनी त्यांच्या घरी जाऊन अध्यापन करावे ही ” शिक्षण आपल्या दारी” प्रक्रिया राबवली.

हे अभियान यशस्वी करण्या साठी शिक्षक यशवंत निकवाडे हे शिरपूर तालुक्यातील सर्वात शेवटचे डोंगराळ भागातील, मध्यप्रदेशाचा सिमेलगत असणारे अतिशय दुर्गम गाव “गु-हाडपाणी “ईथे जाऊन ते अध्यापन करत आहेत. पाड्यावर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना ते गोळा करतात बांबूनी बनवलेल्या झोपडीत 2 री ते12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.त्यांचे कार्य खरच प्रेरक असून त्यांच्या ह्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या सर्वत्र शाळा बंद आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना आॕनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.मात्र आदिवासी डोंगराळ दुर्गम भागात आॕनलाईन शिक्षणाची सोय नसल्यामुळे येथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे शिक्षण आपल्या दारी या उपक्रमातंर्गत आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहोत.चार भिंतीच्या आत दिले जाणारे शिक्षण आणि निसर्गाच्या सानिध्यात दिले जाणारे शिक्षण यांच्यातील फरक आज मला जाणवला.खरोखरच आदिवासी विद्यार्थ्यांच्या समोरील आव्हाने खुप मोठी असतात आणि त्यातुन ते मार्गक्रमण करून यशस्वी होत असतात.डोंगराळ भागात जाऊन आध्यापनाचे कार्य करणे हे माझे भाग्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे

यशवंत निकवाडे(आश्रम शाळा,वर्षी ता शिंदखेडा)