तहसीलदारांकडून 8/12/2022 रोजी पिक विमा व कृषी अधिकाऱ्यांन सोबत अधिकृत बैठकीचे आश्वासन.
आज दिनांक 07/12/2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्शी यांच्या वतीने तहसिल कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

खालील मुद्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले :
1) अल्पसंख्याक विध्यार्थीची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती सुरू ठेवावी व त्या शिष्यवृत्ती मध्ये 3000 रुपये वाढ करावी.
2) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक अपशब्द वापरतात तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल अवमानकारक अपशब्द वापरून महाराष्ट्रतील जनतेच्या भावना दुखावतात त्यामुळे कोश्यारी यांची हकालपट्टी करावी.
3) केंद्र सरकारच्या पीक विमा कंपनीकडून जो अत्यल्प विमा शेतकऱ्यांना दिऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केले.
या तिन्ही विषयावर बार्शी शहर राष्ट्रवादी काँग्रेस,तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व अल्पसंख्याक सेल बार्शी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, सोलापुर महिला जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, बार्शी तालूका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, बार्शी शहर अध्यक्ष, युवक अध्यक्ष, अल्पसंख्यांक अध्यक्ष, सर्व प्रभाग अध्यक्ष, पक्षातील पधाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले