तेर प्रतिनिधी :-
होय राष्ट्रीय लगोरी स्पर्धा!
अगदी प्राचीन काळापासून भारतात खेळला जाणारा हा खेळ, आज पर्यंत लगोरी हा खेळ शाळेत खेळाच्या तासाला किंवा गल्लीत खेळला जाणारा खेळ म्हणुन या खेळाकडे पाहत आलो आहे परंतू हा खेळ राज्य पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जातो हे आपण प्रथमच ऐकत असाल.
भारतात खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक लगोरी या खेळाच्या राष्ट्रीय सिनियर अजिंक्यपद स्पर्धा दि. 14 ते 16 एप्रिल या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील प्रांगणात होत असून या स्पर्धेसाठी देशभरातील 18 राज्यातून 30 संघ सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय लगोरी स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष व उस्मानाबाद जिल्हा लगोरी असोसिएशनचे सचिव अमोल कस्तुरे यांनी तेर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश छत्तीसगड, उत्तराखंड, हरियाना, केरळ, तेलंगणा, पाँडेचरी, गुजरात, झारखंड , चंदीगड, दादरा नगर हवेली, दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, गोवा आदिंसह १८ राज्यातील मुलीचे १२ व मुलांचे १८ असे एकूण ३० संघ सहभागी होणार आहेत हे सामने डे नाईट पध्दतीने खेळविले जाणार आहेत.
दि. १४ ते १६ या कालावधीत संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेतून सप्टेंबर २०२२ मध्ये थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेसाठी भारतीय संघांची निवड केली जाणार आहे विशेष म्हणजे हा खेळ पुर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खेळला जात असे सातवाहन काळात हा खेळ खेळला जायचा तेरचा प्राचीन इतिहास सातवाहन काळाशी संबंधित असल्याने या खेळाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजन करण्याचा मान मराठवाड्यातील तेर या ऐतिहासिक प्राचीन नगरीला प्रथमच मिळाला असल्याचे आयोजक अमोल कस्तुरे यांनी यावेळी सांगितले.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न