तेर प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे विविध योजनेतून मिळालेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून गावातील विविध भागात केलेल्या विकासकामांचे लोकार्पण रविवार दिनांक १० रोजी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शिफारसीनुसार व जि.प.सदस्या अर्चनाताई पाटील यांच्या पाठपुराव्याने २५१५ योजनेतून तेर येथील विठ्ठलनगर भागातील २७० मीटर लांबीच्या सिमेंट रस्ता व जिल्हा परीषदच्या सेस फंडातून ७ लाख रूपये खर्चून नृसिंह वेस, दरबार गल्ली, गणपती चौक, जुने व नवीन बसस्थानक, गोरोबा गल्ली, निळा झेंडा चौक आदि ठिकाणी उभारण्यात आलेल्या ७ हायमास्ट लँम्पचे लोकार्पण अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, ग्रा. प. सदस्य इर्शाद मुलांनी, मंगेश पांगरकर, बापू नाईकवाडी, माजी उपसरपंच भारत नाईकवाडी, भुषण भक्ते, बाबा पवार, अविनाश माने, हरी भक्ते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद