तेर प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तेर ता उस्मानाबाद येथील अहिल्याबाई होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने महाराष्ट्र संत विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक १९ मे रोजी इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी मधील जवळपास १३० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी एस एस बळवंतराव , एम एन शितोळे , समितीचे अध्यक्ष शिवाजी पडूळकर , उपाध्यक्ष नवनाथ पसारे , सचिव सचिन देवकते , हरी भक्ते , रमेश लकडे , गोविंद पांढरे , अमोल खांडेकर , प्रविण साळुंके , महादेव थोरात , काका देवकते , बालाजी बनकर , संजय जाधव , सहशिक्षक महादेव भंडारे , सुर्यकांत खटिंग , एस यु गोडगे , अतुल राठोड , एस डी घाडगे , सतिश भालेराव , एस बी पाटील , एम डी नरसिंगे , श्रीमंती झालटे , आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते दरम्यान स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कला शिक्षक एस टी गांगुर्डे , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , एस यु गोडगे , महादेव भंडारे , आदिनी परिश्रम घेतले
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप