Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > बार्शी टाऊन लायन्स क्लबच्या नवीन अध्यक्षांचा

बार्शी टाऊन लायन्स क्लबच्या नवीन अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ रविवारी

बार्शी टाऊन लायन्स क्लबच्या नवीन अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ रविवारी
मित्राला शेअर करा

बार्शी, 12 जुलै 2024 : बार्शी टाऊन लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ला. महावीर कदम यांच्या नेतृत्वात हेमंत जमदाडे सचिवपदी आणि किरण आवटे खजिनदारपदी निवडले गेले आहेत. या निमित्ताने रविवार, 14 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी या समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

या समारंभास मार्गदर्शनपर उपस्थिती म्हणून प्रेरणादायी वक्ता डॉ. भावेशजी भाटिया यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

डॉ. भावेशजी भाटिया यांची प्रेरणादायी यशोगाथा त्यांच्या नेत्रहीनतेमुळे सुरू झाली. वयाच्या 23व्या वर्षी दृष्टी गमावल्यानंतर त्यांनी मेणबत्तीच्या व्यवसायाची सुरुवात केली. आज, त्यांच्या सनराइज कँडल कंपनीद्वारे त्यांनी कोटींचा व्यवसाय उभा केला आहे. त्यांनी देशातील 9000 दिव्यांगजनांना रोजगार दिला आहे, आणि त्यांची उत्पादने जगभरातील अनेक देशांमध्ये विकली जातात.

  • लहानपणापासून दृष्टी कमजोर असतानाही त्यांनी कलाकुसर आवडीने शिकली.
  • शालेय जीवनात अनेक आव्हानांचा सामना करून, त्यांनी मेणबत्तीच्या व्यवसायात मोठे यश मिळवले.
  • 52 वर्षीय भावेशजी यांच्या कंपनीत सध्या 10 हजारहून अधिक प्रकारच्या मेणबत्त्या डिझाइन केल्या जातात.

तरी सर्वांनी विनंती अशा महान प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला ऐकण्यासाठी रविवार, 14 जुलै रोजी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती.