सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी च्या वतीने ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील तलावात साकारण्यात आलेल्या लेसर शोच्या माध्यमातून सोलापूरचा इतिहास उलगडणारा लाईट अँड साऊंड शो या प्रकल्पाचे लोकार्पण आज माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी,आमदार विजयकुमार देशमुख,आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील,उपायुक्त मच्छिद्र घोलप,सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे,माजी सभागृह नेते संजय कोळी, संजय धनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. या लाईट अँड शो प्रकल्पात म्युझिकल फॉन्टन, ओन वॉटर स्क्रीन, लेझर थीम आणि लाईट शो बसवण्यात आले आहे. तसेच ऑडिओ व्हिडिओ ट्रॅक मध्ये असलेले या शोचा कालावधी 30 मिनिटांचा आहे.
सोलापूर शहराचा इतिहास स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरचे योगदान श्री ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे चरित्र तसेच त्यांनी केलेले लोकोपयोगी कार्य शहरातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले हाजी शहाजूर वली यांचे चरित्र यांचा समावेश असलेला हा माहितीपट मराठीसह कन्नड आणि हिंदी भाषेतून शो मधून दाखवण्यात येणार आहे या लाईट अँड साऊंड शोमुळे सोलापूर शहराच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प असून यामुळे सोलापुरात येणाऱ्या पर्यटकांची निश्चितच वाढ होईल. हे लाईट अँड साऊंड शो उद्या पासून सोलापूर करासाठी सुरू होणार असून हे शो सोमवार ते शुक्रवारी दररोज सायंकाळी 7:00 ते 7:30 वाजता मराठीतुन माहितीपटाचे एक शो होईल व शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 7:00 ते 7:30 व 8:00 ते 8:30 असे दोन शो मराठी व कन्नडमधून माहितीपट दाखविण्यात येईल.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद