Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > इथे पहा दहावी परीक्षा (ssc result) निकाल

इथे पहा दहावी परीक्षा (ssc result) निकाल

इथे पहा दहावी परीक्षा (ssc result) निकाल
मित्राला शेअर करा

उद्या 17 जून रोजी दहावीचा निकाल SSC 10th Result 2022 जाहीर करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता प्रतीक्षा होती दहावीची परीक्षा निकालाची Ssc परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल ssc result maharashtra board जाहीर केले जाणार आहेत.

बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो खालील लिंक वर वर पाहता येणार आहे. त्यासाठी लिंकवर क्लिक करा.

https://ssc.mahresults.org.in/

https://sscresult.mkcl.org/

निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यी प्रविष्ट झाले होते. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

Covid परिस्थिती नंतर प्रथमच ऑफलाइन परीक्षा झाली आहे त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.