समग्रशिक्षाअभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री सर्वश्री संजय राठोड, संजय बनसोडे, शंभूराज देसाई उपस्थित होते.
यावेळी २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत फेर पडताळणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ