सोलापूर – महानगरपालिकेच्या वतीने आज श्री सिद्धेश्वर मंदिर येथे लहान मुलांनाच्या मनोरंजन साठी ट्राय ट्रेनची सुरवात करण्यात आले आहे. या ट्राय ट्रेनचे उदघाटन आज कोल्हापूरचे तथकालीन आयुक्त श्री मलिनाथ कलशेट्टी आणि प्रशासक तथा महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या शुभहस्ते तर श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज कडादी यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, देवस्थानचे सदस्य राजशेखर येळेकर,उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.स्मार्ट सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एडवेंचर पार्क, स्ट्रीट बाजार, होम मैदान तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रक व बगिच्या विकसित करण्यात आले आहे.
त्याच अनुषंगाने लहान मुलांना या ठिकाणी मनोरंजनासाठी ट्राय ट्रेन ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तिकिटाचे दर मोठया व्यक्तीला 20 रुपये, लहान मुलाना 10 रुपये आकारण्यात येणार आहे.या ट्राय ट्रेन ची सफर आज पासून सोलापूरतील नागरिकांना घेता येणार आहे.यावेळी आयुक्त व मान्यवर यांनी मंदिर परिसरात साकारण्यात येणाऱ्या लाईट अँड साऊंड शो या ठिकाणची पाहाणी केली.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान