Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > तुळजापूर कोजागिरी यात्रा रद्द पायी चालत येणाऱ्या भाविकांना प्रवेश बंदी उस्मानाबाद जि. पोलिस प्रशासनाचे निर्देश

तुळजापूर कोजागिरी यात्रा रद्द पायी चालत येणाऱ्या भाविकांना प्रवेश बंदी उस्मानाबाद जि. पोलिस प्रशासनाचे निर्देश

मित्राला शेअर करा

नवरात्री व कोजागिरी पौर्णिमा या निमित्ताने तुळजापूरात पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते परंतु covid च्या पार्श्वभूमीवर दिनांक 07/10/2021 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशात बदल करण्यात आला आहे . उप विभागीय पोलीस अधिकारी , उप विभाग तुळजापूर यांनी अहवालात सादर केले आहे की , श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव कोजागीरी / मंदिर पौर्णिमा दिनांक 19/10/2021 ते दिनांक 20/10/2021 रोजी आहे . सदर कोजागीरी / मंदिर पौर्णिमा कालावधीत तुळजापूर शहरा मध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते . तसेच उस्मानाबाद , लातुर ,नळदूर्ग , सोलापूर , उमरगा , हुमनाबाद , गुलबर्गा बिदर या ठिकाणाहून लोखोंच्या संख्येने भाविक पायी चालत येण्याची परंपरा आहे . तथापी जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरण उस्मानाबाद यांचे कडील कोविड -19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन कोजागीरी यात्रेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे . व राज्यातील व राज्याबाहेरील सर्व नागरीकांना यात्रेकरीता दिनांक 18/10/2021 ते 20/10/2021 दरम्यान जिल्हाबंदी असणार आहे , त्यामुळे राज्यातील राज्या बाहेरील नागरीकांना तुळजापूर शहरात प्रवेश देण्यात येणार नाही , असे आदेश निर्गमित केले आहेत . जरी भाविकांना यात्रेकरीता तुळजापुर शहर बंदी असली तरी वर नमुद ठिकाणांवरुन भाविक तुळजापूर कडे पायी चालत येण्याची शक्यता नाकारता येत नाही . भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता भाविक पायी चालत येणान्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनास कळविण्यात आले होते. तसेच मंदिर परिसर , तुळजापूर शहर हद्द व जिल्हा हद्दीत अतिरीक्त गर्दी होवुन आपत्ती उदभवू नये यासाठी करावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तुळजापूर कडे येणारे मार्गावरील सर्व प्रकारची वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने . कौस्तुभ दिवेगावकर ( भा.प्र.से. ) , जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद व नीवा जैन भा.पो.से. ) . पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 ( 1 ) ( ब ) अन्वये भाविकांचे सुरक्षीततेच्या कारणावरून खालील प्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणे बाबत निर्देशित करण्यात आले आहेत .

वहातूक मनाई व वळविण्यात आलेले मार्ग

भाग एक दिनांक 18/10/2021 रोजीचे 00:01 ते दिनांक 20/10/2021 रोजीचे 24:00 वाजे दरम्यान खालील मार्गावरून पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या वाहनास ( Light & Heavy Vehicles ) मनाई करण्यात येत आहे . 1 ) उस्मानाबाद ते हैद्राबाद कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास उस्मानाबाद , तुळजापूर , नळदुर्ग , उमरगा , हैद्राबाद या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 2 ) हैद्राबाद ते उस्मानाबाद कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास उमरगा , नळदुर्ग , तुळजापूर , उस्मानाबाद या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 3 ) हैद्राबाद ते औरंगाबादकडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास उमरगा , नळदुर्ग , तुळजापूर , उस्मानाबाद , येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 4 ) औरंगाबाद ते हैद्राबादकडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा . उस्मानाबाद , तुळजापूर , नळदुर्ग , उमरगा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 5 ) उस्मानाबाद ते सोलापूर कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास उस्मानाबाद , तुळजापुर , तामलवाडी . सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 6 ) सोलापूर ते उस्मानाबाद कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास सोलापूर तामलवाडी , तुळजापूर उस्मानाबाद या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 7 ) लातुर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास लातूर , औसा , तुळजापूर ,
तामलवाडी , सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 8 ) सोलापूर ते लातुर कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास सोलापूर , तामलवाडी , तुळजापूर औसा . लातुर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 9 ) औरंगाबाद ते सोलापूर कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा , उस्मानाबाद , तुळजापूर तामलवाडी , सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 10 ) सोलापूर ते औरंगाबाद कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास सोलापूर , तामलवाडी तुळजापूर , उस्मानाबाद येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 11 ) तुळजापूर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर तामलवाडी , सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 12 ) सोलापूर ते तुळजापूर कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास सोलापूर , तामलवाडी , तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे . 13 ) तुळजापुर ते बार्शी कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर . ढेकरी , गौडगाव , बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे 14 ) बार्शी ते तुळजापूर कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी , गौडगाव , ढेकरी , तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे .

भाग 2 : – सदरील मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील.

1 ) उस्मानाबाद ते हैद्राबाद कडे जाणारी वाहतुक औसा , उमरगा मार्गे हैद्राबादकडे पथक्रमण करतील . 2 ) हैद्राबाद ते उस्मानाबाद कडे येणारी वाहतुक हैद्राबाद , उमरागा . औसा मार्गे पथक्रमण करतील. 3 ) हैद्राबाद ते औरंगाबाद जाणारी वाहतुक उमरगा , औसा , लातूर , अंबाजोगाई , मांजरसुंबा , बीड मार्गे औरंगाबाद कडे पथक्रमण करतील . 4 ) औरंगाबाद ते हैद्राबाद कडे येणारी वाहतुक औरंगाबाद , बीड , मांजरसुंबा , अंबाजोगाई , लातूर , औसा , उमरगा मार्गे हैद्राबादकडे पथक्रमण करतील . 5 ) उस्मानाबाद ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक वैराग मार्ग पथक्रमण करतील . 6 ) सोलापूर ते उस्मानाबाद कडे येणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील , 7 ) लातुर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक मुरुड , ढोकी , येडशी , बार्शी , सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील . 8 ) सोलापूर ते लातुर कडे येणारी वाहतुक सोलापूर , बार्शी येडशी , ढोकी , मुरुड , लातुर या मार्ग पथक्रमण करतील . 9 ) औरंगाबाद ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक येरमाळा , बार्शी , सोलापूर या मार्ग पथक्रमण करतील 10 ) सोलापूर ते औरंगाबाद कडे येणारी वाहतुक सोलापूर , बार्शी , येरमाळा या मार्ग पथक्रमण करतील 11 ) तुळजापूर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक मंगरुळपाटी , इटकळ , बोरामणी , सोलापूर या मार्ग पथक्रमणः करतील .
12 ) सोलापूर ते तुळजापूर कडे येणारी वाहतुक सोलापूर , बोरामणी , इटकळ , मंगरुळपाटी , तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील . 13 ) तुळजापूर ते बार्शी कडे जाणारी वाहतुक तुळजापूर , उस्मानाबाद , वैराग , बार्शी या मार्गे पथक्रमण करतील . 14 ) बार्शी ते तुळजापूर कडे येणारी वाहतुक बार्शी , वैराग , उस्मानाबाद , तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील .

वरील बंधने ही पोलीस , रूग्ण सेवा , अग्निशमन दलाच्या वाहने , अत्यावश्यक सेवेतील वाहने व एस.टी. बसेस या वाहनांना लागू राहणार नाही .