Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > उंडेगावचे सुपुत्र IAS संतोष पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार

उंडेगावचे सुपुत्र IAS संतोष पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार

उंडेगावचे सुपुत्र IAS संतोष पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार
मित्राला शेअर करा

उंडेगाव ता. बार्शीचे सुपुत्र श्री संतोष चंद्रकांत पाटील यांची भारतीय प्रशासकीय सेवा, आयएएस पदी निवड झाल्याबद्दल, समस्त उंडेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित माजी मंत्री तथा आमदार श्री सुभाष (बापू) देशमुख,बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत, सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर साहेब, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी. वाय यादव, संचालक साखर आयुक्त पुणे श्री संतोष पाटील, सहायुक्त राज्यकर विक्रीकर भवन मुंबई श्री प्रकाश शेळके, उपवनरक्षक वन विभाग सोलापूर श्री धैर्यशील पाटील, जिल्हा कृषी अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे इतर प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांचे बालमित्र व उंडेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.