आमदार निधी जनतेसाठीच असतो आणि तो त्यांच्यासाठीच मी खर्च करत आलो आहे. उपकार म्हणून नव्हे तर कर्तव्यनिष्ठा म्हणून मी ही विकास कामे करतोय, असे मत आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.
बार्शी शहरातील तुळजापूर रोड, येथील वीरशैव लिंगायत समाज रुद्रभूमीत ( लिंगायत स्मशानभूमी) आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या ७५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष ऍड.असिफभाई तांबोळी , वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विलास रेणके, बाजार समिती संचालक रावसाहेब मनगिरे, माजी उपनगराध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब आडके, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील , नगरसेवक विजय राऊत , उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले , मल्लिनाथ गाढवे , शिवशंकर बगले , राजाभाऊ भडूळे, नंदकुमार होनराव, दिलीप गांधी , प्रशांत कथले , आप्पा गुडे , आप्पा साखरे आदी उपस्थित होते.
जातीच्या , धर्माच्या पलिकडे जाऊन माणूसपण जपत काम करणारा राजकारणी खरा राज्यकर्ता म्हणवला जात असतो. विकास कामे करताना आपण जातीचा, धर्माचा निकष न लावता मागणी केलेल्या कामांपेक्षा अधिक पटीने जनतेची कामे केली, असेही आमदार राऊत म्हणाले.
रुद्रभूमीची दुरावस्था झाली होती, म्हणून वीरशैव लिंगायत समाज संस्थेच्यावतीने सुधारणा मोहीम हाती घेण्यात आली. अंतर्गत रस्ते, वीज, खोदाई यंत्र आशा अनेक बाबी आवश्यक होत्या. अशावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी मोठ्या मनाने १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यापैकीच ७५ लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ आज झाला आहे.
यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, प्रा. शिवपुत्र धत्तूरगावकर, बाळासाहेब आडके, विलास आप्पा रेनके आदींची भाषणे झाली.
प्रास्तविक व सूत्रसंचालन अनिल बेने यांनी केले. यावेळी लिंगायत समाजातील पोटजातीसह समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम