Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > वैराग नगरपंचायतीसाठी होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीसाठी १६७ उमेदवारी अर्ज दाखल, मात्र ना. मा. प्र. जागांवरील भावी नगरसेवकांची निराशा

वैराग नगरपंचायतीसाठी होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीसाठी १६७ उमेदवारी अर्ज दाखल, मात्र ना. मा. प्र. जागांवरील भावी नगरसेवकांची निराशा

मित्राला शेअर करा

वैराग प्रतिनिधी (तांबोळी जे. एम. सर)

दि.8 येथील नुतन वैराग नगरपंचायतीसाठी होणाऱ्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना व अपक्ष या सर्वांनी मिळून मंगळवारी १०३ जणांगचे उमेदवारी अर्ज भरले. यापूर्वी ६४ अर्ज दाखल झाले असून १७ प्रभागात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल एकूण १६७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेले राजकीय आरक्षण स्थगित झाले असल्यामुळे एकूण ४ प्रभाग वगळून १३ प्रभागातच निवडणूकीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

काही प्रभागातील भावी नगरसेवकांची निराशा
सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत स्थगित झालेल्या प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक ३, ९, १०, १५ यांचा समावेश आहे.उमेदवारी अर्ज दाखल केलेले भावी नगरसेवक उत्साहात प्रचाराच्या योजना आखत असले तरी नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभागातील निवडणूक स्थगित झाल्याने या प्रवर्गातील नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या अनेकांची निराशा झाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वैराग नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी आरक्षण सोडत

वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून मंगळवारी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यापूर्वी १६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना या पक्षांसह अपक्षांनी मिळून १६७ अर्ज दाखल केले आहेत.