विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन साठी विधिमंडळात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. तसेच राज्यपालांच्या अभिभाषणासाठी मध्यवर्ती सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर विधानभवनातील समिती कक्षात मंत्रिमंडळ बैठक घेतली.

विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संसदीय कार्य मंत्री ॲङ अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह मंत्री-राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी