सुभाष नगर बार्शी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक विचारांना अनुसरुन तमाम बार्शीकरांना सुमित खुरंगळे या तरुणाने एक आव्हान केले होते.
“वर्गणी नको पुस्तक द्या”
या आव्हानाला बार्शीकरांनी, सहकारी मित्र परिवार, हितचिंतकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

सुभाष नगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्थानिक युवकांसोबत मुला मुलींनी व त्यांच्या पालकांनी, तसेच “श्री करियर” अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग दाखवला.
Mpsc Upsc, पोलीस भरती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बार्शी पोलीस स्टेशन शिस्तप्रिय पोलीस निरीक्षक रामदास शेळके साहेब, स्मार्ट अकॅडमी चे
सचिन वायकुळे सर अजित दादा कांबळे, सत्यजित जानराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
यावेळी प्रसिध्द व्याख्याते
प्रा. विशाल गरड, वृक्ष संवर्धन समितीचे उमेश काळे, राणादादा देशमुख, संपतराव देशमुख, नगरसेवक संदेश काकडे, पत्रकार गणेश गोडसे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन – NDS निरंजन सवणे यांनी केले तर सुजाता ताई अंधारे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
या वेळीओन्ली समाज सेवा ग्रुप चे अध्यक्ष राहुल भैय्या वाणी व त्यांचे सहकारी पदाधिकारी ॲड. प्रसन्नजीत नाईकनवरे, राकेश नवगीरे (काँग्रेस युवा अध्यक्ष) सनी गायकवाड, (RPI आठवले गट) सचिन लोकरे (आझाद समाज पार्टी ) सचिन भालेराव(आझाद समाज पार्टी अध्यक्ष) रेखा ताई सरवदे, (वंचित बहुजन आघाडी) प्रमिला ताई झोंबाडे, (बार्शीची रणरागिणी) आगलावे मॅडम, हनुमंत हिप्परकर, अजय रजपूत, नितीन जाधव, रोहित गावसाने, शंकर दोडके, शुभम जाधवर, फोटोग्राफर अमोल शिरसागर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पुस्तक स्वरुपात ज्ञानरुपी ताकत देणाऱ्या सर्वाचे संयोजकांकडून मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
More Stories
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले