Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > वैराग नगरपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम नुसती फार्स

वैराग नगरपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम नुसती फार्स

मित्राला शेअर करा

जाकीर तांबोळी (वैराग प्रतिनिधी)

वैराग मधील हिंगणी रोड व गावठाण तलाव परिसरातील अतिक्रमण मोठा फौजफाटा घेऊन जेसीबी चालवत काढण्यात आले. परंतु वैरागचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमणाकडे मात्र डोळेझाक केल्याने व पुन्हा अतिक्रमण होत असल्याने वैराग नगरपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम नुसती फार्स होती असे वैरागच्या जनतेतून मधून बोलले जात आहे व संताप व्यक्त केला जात आहे.

वैराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणामुळे नेहमी चक्काजाम परिस्तिथी दिसून येते

येथील बस स्थानकाकडे जाणाऱ्या हमरस्त्यावरील, छत्रपती शिवाजी चौक परिसर, मधला मारुती चौक परिसर व गांधी चौकापर्यंत जाणाऱ्या हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला गाळेधारक टपरीधारकांनी अतिक्रमण केलेले असल्याने येथून पायी चालणे मुश्किल झाले आहे. वारंवार लहान मोठ्या वाहनांच्या रांगा लागत असून रस्ते अपघातसह ट्राफिक जाम ची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. या ठिकाणच्या गाळेधारकांनी केलेले अतिक्रमण काढणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. वैराग चा आठवडी बाजार दर गुरुवारी भरतो या आठवडी बाजारासाठी 57 खेड्यातील ग्रामस्थ येतात. या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाऱ्यामध्ये पहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज परिसरात वैराग नगरपंचायतीची शॉपिंग सेंटर आहेत. या शॉपिंग सेंटर मधील किराणा, मेडिकल व इतर गाळेधारकांनी आपल्या गाळ्या शिवाय पुढे पत्रे वाढवून दुकाने थाटली आहेत. त्याच्याही पुढे आपल्या दुकानातील सामान ठेवून रस्त्यावरील जाणार येणार याची अडवणूक केली जात आहे.

एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत दुकानदारास विचारले असता अशा नागरिकास दुकानदार हुज्जत घालतो आहे. त्यामुळे अनेक वेळा हमरीतुमरी चे प्रसंग सद्धा पहायला मिळाले आहेत. या परिसरातील दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे या परिसरातून चारचाकी वाहने चालवणे तर लांबच दुचाकी वाहने चालवणे पण मुश्कील होते आहे. त्यामुळे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होताना दिसून येतात. त्यामुळे अतिक्रमणाबाबत वैराग नगरपंचायतने ठोस भूमिका घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

याचबरोबर बार्शी शहराप्रमाणे वैराग मध्ये सुद्धा बेशिस्त ट्राफिक व वाहनांचे पार्किंग याकडे ही प्रशासनाने लक्ष्म देणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.