विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र (धाराशिव) यांच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व भूम-परंडा-वाशीचे आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांना भूम-परंडा-वाशी तालुक्यातील अत्यावश्यक सेवा आरोग्य साठी बार्शी ला जाणारे रस्ते व भूम येथे अत्याधुनिक सुविधा युक्त हॉस्पिटल उभारणीच्या मागणीचे निवेदन दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिले
विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्यच्या सौ.छाया (दिदी) भगत संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यावर कार्य करते.
भूम-परंडा-वाशी तालुक्यात एकही अत्याधुनिक सुविधा युक्त हॉस्पिटल नसल्याने भूम-परंडा-वाशी तालुक्यातील रुग्णांना बार्शी जि.सोलापूर येथे जातात. बार्शी येथे डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, हिरेमट हॉस्पिटल व इतरही मोठमोठे हॉस्पिटल असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मधुमेह, कॅन्सर, महिला प्रसुती, शस्त्रक्रिया, इतर गांभीर आजार असणारे वयोवृद्ध, लहान बालकांना दवाखाना व औषधोपचारासाठी आरोग्य सेवेसाठी जावे लागते.
तसेच या तालुक्यातील १) भूम ते जिल्हा सरहद्द निपाणी मार्गे लांजेश्वर, आंद्रुड, ईट सुकटा २) भूम ते बार्शी मार्गे आरसोली, देवळाली, मांडेगाव ३) भूम ते बार्शी मार्गे माणकेश्वर ४) भूम ते बार्शी मार्गे वंजारवाडी, चुंब, कोरेगाव ५) पाथ्रुड ते बार्शी मार्गे वालवड, जवळा (नि), भांडगाव , ६) भूम ते सरमकुंडी मार्गे कुंथलगिरी, भोनगिरी, ७) भूम ते धारवाडी मार्गे आष्टा इत्यादी रस्ते पुर्णतः खराब झाल्याने बराच वेळ लागत असल्याने अर्ध्या रसत्याच रुग्णांना मृत्यू ला सामोरे जावे लागते.
भूम हे धाराशिव जिल्ह्यातील उपजिल्हयाचे ठिकाण असल्याने अत्याधुनिक सुविधा युक्त हॉस्पिटल उभारावे जेणेकरून रुग्णांना लाभ होईल व मृत्यू ला सामोरे जावे लागणार नाही असे निवेदन जिल्हा समन्वयक सोमनाथ कोकाटे धाराशिव आदी ने दिले.
More Stories
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील