कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी मधील विद्यार्थ्यांनी प्रगतशील शेतकरी डॉ. नवनाथ कसपटे यांच्या बार्शी येथील सिताफळ संशोधन केंद्रास नविन राष्ट्रीय शैक्षणीक धोरण २०२० नुसार दीक्षारंभ कार्यक्रमां अंतर्गत भेट दिली.
सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. नवनाथ कसपटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सिताफळ फळपिकावरील संशोधन कशा पध्दतीने चालते, संशोधनाची सुरवात, सिताफळांचे वाण, अभिवृध्दी, रोग व कीड व्यवस्थापन, विक्री व्यवस्था, प्रक्रिया उद्योगास भविष्यात संधी, यांची तसेच त्यांचेकडे असलेल्या सिताफळ पिकाचे ३००० वाणांचे नमुने असलेबाबतची सविस्तर माहिती दिली. सिताफळ हे पीक अत्यंत कमी पाण्यावर व कमी खर्चात येत असून याकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन कसा बदलता येईल व त्यांना जास्तीचे उत्पन्न कसे मिळवून दिले जाऊ शकते यावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांचे ज्ञानार्जनावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकावर भर द्यावा व याचा वापर त्यांच्या शेतात करावा असे आव्हान केले. तसेच आपल्या शेतीकडे पारंपारिक पध्दतीने न पाहता आधुनिक तंत्रज्ञान वापरुन जास्तीत जास्त नफा मिळवता येतो यावर मार्गदर्शन केले.
अभ्यास दौऱ्याचे नियोजन, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष श्री एन. एन. जगदाळे, सचिव, श्री. पी. टी. पाटील, सहसचिव, श्री. ए. पी. देबडवार, खजिनदार, श्री. जे. सी. शितोळे व प्रभारी प्राचार्य, श्री. पी. आर. गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. बोनगे व्ही. ई., डॉ. शेंडे एस. एस. आणि कु. डॉ. बर्गे एम. एस. यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांनी दीक्षारंभ कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
More Stories
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न