Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > वॉटर एटीएम : PMEGP च्या माध्यमातून रोजगार निर्मितीची नवी संधी!

वॉटर एटीएम : PMEGP च्या माध्यमातून रोजगार निर्मितीची नवी संधी!

वॉटर एटीएम : PMEGP च्या माध्यमातून रोजगार निर्मितीची नवी संधी !
मित्राला शेअर करा

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्रा अंतर्गत आता ‘फुड ऑन व्हील’ प्रमाणेच ‘वॉटर एटीएम’ संकल्पनेला देखील चालना देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांना निकषानुसार ५०,००० ते २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

‘वॉटर एटीएम’ ही देखील एक नवीन संकल्पना आहे. या माध्यमातून २० लिटर पाण्याचा जार नागरिकांना घरपोच उपलब्ध करून देता येणार आहे. यात एका मोठ्या ट्रक मध्ये १०० ते २०० लिटर पाण्याच्या हायजेनिक टाक्या बसविलेल्या असतात. यातून आधुनिक पद्धतीने फिल्टर करून पाणी शुद्ध व थंड केले जाते. ही गाडी कोणत्याही ठिकाणी नेऊन व्यावसायिकाला शुद्ध आणि थंड पाण्याचा पुरवठा ग्राहकांना करता येऊ शकतो. त्यासाठी लागणारी गाडी, पाण्याची टाकी, फिल्टरलायझेशन मशनरी व इतर भांडवली खर्च कर्जामार्फत उपलब्ध करण्यात येईल.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता असते. अशावेळी या व्यवसायाच्या माध्यमातून वेळेत, मुबलक, स्वच्छ, शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध होईल व यातून अनेकांना रोजगारही मिळेल. या नावीन्यपूर्ण संकल्पनेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होत आत्मनिर्भर्तेकडे एक पाऊल टाकावे.

त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आपल्या कार्यालयामार्फत करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.