लायन्स क्लब बार्शी टाऊन तर्फे सतत सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात याचाच एक भाग म्हणून व महिला दिनाचे औचित्य साधून बार्शी शहराच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या आशा सेविकांसाठी क्लब तर्फे विमा संरक्षण पाँलिसी काढण्यात आली.

याप्रसंगी शहरातील ६० आशा सेविका उपस्थित होत्या, या सर्व अशा सेविकांना विमा संरक्षण देण्यात आले.

लायन्स क्लब चे अध्यक्ष अजित देशमुख, सचिव रवि राऊत , खजिनदार प्रितम सुरवसे, अँड वासुदेव ढगे, डॉ. सागर हाजगुडे, डॉ. घोडके तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ