बार्शी शहर-तालुक्याच्या राजकारण,समाजकारण तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध जाणकार व्यक्तिमत्व राहिलेले आदरणीय कै.अर्जुनराव(आण्णासाहेब)बारबोले यांची ८८ वी जयंती बार्शीतील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ येथे साजरी साजरी करण्यात आली.

पितृतुल्य मार्गदर्शक,यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी चे संस्थापक-अध्यक्ष आदरणीय कै.अर्जुनराव (आण्णासाहेब) बारबोले यांच्या ८८ व्या जयंती निमित्त आमदार राजाभाऊ राऊत यांनी आण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले; त्याचबरोबर दिपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील-सर, संस्थेचे अध्यक्ष अरुण (दादा) बारबोले,अतुल सोनिग्रा,अर्जुनसिंह बारबोले,मोहन लोहार-सर,शाखांचे मुख्याध्यापक,कर्मचारी व सेवक वृंद आदी उपस्थित होते.

More Stories
तेर येथील नेत्र तपासणी शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी; ५०० रुग्णांना चष्म्याचे वाटप
सुरेश डिसले यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा