पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनंतर
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही व त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, रोज वाढणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे
या पूर्वी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी अशा चर्चा सुरू होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आलाय.
आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केलं जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केला
तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ऑफलाइनच होईल असे ही सांगण्यात आले आहे त्याबाबत २ दिवसात निर्णय घेतला जाईल .

More Stories
वाशी (जि. धाराशिव) येथे शासकीय आयटीआय जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सानिध्यात संपन्न