बार्शी शहरातील मंगळवार पेठ झोपडपट्टी येथे निराधार व गरजवंत लोकांसाठी पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली -पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी, ओन्ली समाजसेवा ग्रुप, दत्ता (मामा) वाघमारे मित्र मंडळ, जय मातादी ग्रुप बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने बार्शी शहरातील मंगळवार पेठ झोपडपट्टी येथे निराधार व गरजवंत लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक पहिली व दुसरी लसीकरण मोहीम राबवण्यात आली या वेळी त्यांना त्वरित सर्टिफिकेट देण्यात आले.
आपण पाहतो की सुशिक्षित किंवा जागरूक नागरिकांचे मोठया प्रमाणात लसीकरण झाले आहे परंतु समजत असाही वर्ग आहे त्यांना मोबाईल, OTP दूरची गोष्ट दोन वेळच्या जेवणाची सुद्धा पंचाईत आहे त्यांची ही अडचण ओळखून बार्शी शहरातील मंगळवार पेठ झोपडपट्टी येथे निराधार लोकांसाठी लसीकरण शिबिर २८० जणांचे लसीकरण करण्यात येऊन त्यांना त्वरित सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आले.
या सर्व समाजसेवी संस्था व समाजसेवकांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, याची प्रेरणा घेऊन फक्त इथेच नाही तर संपूर्ण देशभरातील समाजसेवी संस्थानी सुध्दा समाजातील निराधार, गोरगरीब लोकांसाठी अश्याप्रकारे कोविड लसीकरण शिबिरे आयोजित करावीत जेणेकरून समाजातील तळागाळातील घटकांतील लोकांपर्यंत लस पोहोचेल आणि तरच देशातील 100 लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
सोलापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा 57 हजार 80 रुग्णांना लाभ
हे शिबीर पोलीस जाणीव सेवा संघाचे तालुकाध्यक्ष – राहुल वाणी, विभाग प्रमुख – उमेश आनेराव, तालुका उपविभाग -प्रमुख समाधान विधाते, बळेवाडी शाखाप्रमुख – सम्मेद तरटे, संघटक – माणकोजी ताकभाते, प्रवीण काळेगोरे, महिला संघटक – रागिनी झेंडे, रेखा सुरवसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी 280 निराधार गरजूंना लस टोचण्यात आली. बार्शीतील नागरिकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला.
कार्यक्रमासाठी मित्र मंडळाचे सदस्य
समाजसेवक दत्ता (मामा) वाघमारे, ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक- भैय्या बारंगुळे, प्रभाकर फपाळ, विकास ढावारे, विकी बारंगुळे, कृष्णा ठोंबरे, बापू बारंगुळे, प्रकाश ढावारे इत्यादींनी परिश्रम घेतले. यावेळी आरोग्य अधिकारी बार्शी श्री ढगे सर व सोनवणे सर यांच्या आदेशानुसार बार्शी आरोग्य मिशनचे कर्मचारी आरोग्यसेविका-आरजू महेदवी, आशावर्कर- कविता ननवरे, पल्लवी गुरव, मानसी शेळगावकर, नूतन क्षीरसागर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान